पुणे महाराष्ट्र

सावधान!!! पुणे, सातारा, सोलापुरवर दहशतीचे काळे ढग!

पुणे | दहशतवादी संघटनांबरोबरच आता हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर पुणे असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एटीएसने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तिन जणांना अटक केली अाहे. 

नालासोपारा येथून एटीएसने वैभव राऊतच्या घरी छापा टाकून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली. त्यात 20 गावठी बॉम्ब, 2 जिलेटीनच्या कांड्या आहेत.

वैभवशी संपर्कात असणाऱ्या शरद कळस्करच्या घरात बॉम्ब बनवण्यासाठीचे मार्गदर्शन देणाऱ्या दोन चिठ्ठ्या सापडल्या. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. या दोघांच्या संपर्कात असलेल्या सुधन्वा गोंधळेकरचा कटात सहभागी असल्याचं समजले. त्यानंतर एटीएसने त्याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, या तिघांच्या चौकशीनंतर पुणे, सातारा, सोलापूर या शहरात घातपाताचा कट असल्याचे समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या