पुण्याला एक नंबरचं शहर बनवणार; देवेंद्र फडणवीसांंचं आश्वासन

पुणे | पुण्याच्या सर्वांगीण विकास करून पुण्याला देशातील क्रमांक एकचे शहर बनवू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

देशातील शाश्वत विकासाचे क्रमांक एकचे शहर बनण्याची पुण्याची क्षमता आहे. गेल्या चार वर्षात त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत, असंही ते म्हणाले.

गेल्या वीस वर्षात ज्यांनी पुण्यासाठी काहीच केले नाही ते आता आमच्यावर टीका करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नव्या कार्य संस्कृतीची सुरवात केली आहे, असंही ते  म्हणाले.

पुण्यात येत्या दोन वर्षात दोन लाख रोजगार निर्माण होतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याचा लौकिक आहे. स्टार्टअपमध्ये देखील पुण्याचाच पहिला क्रमांक असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीत स्पष्ट झालंय, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-बारामतीच्या न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा!

-विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार