गुजरात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 27 वर्षांची परंपरा अखंडित राहिल्याने भाजप नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये 182 जागांसाठी निवडणुका पार पडल्याचं पहायला मिळालं.

एक्झिट पोल पहायला गेल्यास भाजपला (BJP) बहुमतापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्याचं पहायला मिळत आहे. 182 पैकी 157 जागा भाजपला मिळाल्या आहेत. काँग्रेसला मात्र 16 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. आपने आता राष्ट्रीय पक्षात एंन्ट्री केली आहे.

गुजरातचा निकाल हाती आल्याने आता भाजपची धावपळ सुरु झाली आहे. मुख्यमंत्री पद कोणाला मिळतं? कोणतं मंत्री पद कोणाला? ही चर्चा सुरु आहे. अशातच आता गुजरातचे मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. (Chief Minister)

भाजपचे नेते भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे पुढील पाचवर्षासाठी गुजरातचे भावी मुख्यमंत्री असणार आहेत. येत्या 12 डिसेंबरला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक होणार असल्याचं भाजप नेते म्हणत आहेत. या विजयाचं श्रेय भूपेंद्र पटेल यांनी मोदींना दिलं आहे. भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीवेळी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित असतील.

महत्त्वाच्या बातम्या