‘या’ गावाने करून दाखवलं; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव ठरलं

पुणे | पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील नागरिकांचं शंभर टक्के लसीकरण करण्यात आलं आहे. शंभर टक्के लसीकरण पुर्ण झालेले बहिरवाडी हे देशातील पहिले गाव ठरलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गावातील केवळ 27 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली होती. संपुर्ण गाव लसीकरणा पासून वंचित असल्याने ग्रामीण संस्थेच्या वतीने कोवीसील्ड लसीची खरेदी करून हा लसीकरण कार्यक्रम संपुर्ण गावासाठी राबविण्यात आला आहे. केंद्राकडून 50 टक्के, राज्याकडून 25 टक्के आणि 25 टक्के स्वखर्चातून ही मोहीम राबवण्यात आली. पुणे येथील सिरम कंपनीतून कोवीशिल्ड लस घेण्यात आली होती घेण्यात आली आहे.

गावात 18 वर्षांपुढील 540 नागरिक असून या सर्वाना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस दिला आहे. त्याच प्रमाणे सहा महिन्याच्या पुढील जवळपास 150 पेक्षा जास्त बालकांना एनफ्ल्यूइंझाची लस देण्यात आली आहे.

दरम्यान, भारत आजपासून म्हणजेच 21 जूनपासून कोव्हिड 19 विरुद्धच्या लसीकरण मोहिमेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश करत आहे. आजपासून देशात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचं केंद्राकडून मोफत लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी Co-Win अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार नाही. ज्यामुळे दररोज होणाऱ्या लसीकरणाच्या तुलनेत आता लसीकरणात वाढ होण्याची शक्यता आहे

थोडक्यात बातम्या- 

“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण…”

“एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील”

कोरोना संकटकाळात योगाच आशेचा किरण ठरला- नरेंद्र मोदी

जेमिनसनचा पंजा! भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात

पुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

coronacorona freeDeath Ajit pawarPatientVaccinevillageकोरोनागावमृत्यूरूग्णलस