महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात मिळणार शिवभोजन

मुंबई | राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याच्या अंदाज

शेतकऱ्यांसाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा, जुलैअखेरपर्यंत….

जन्माला आला तो मरणारच, एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला…- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या