Top News

देवेंद्र फडणवीसांच्या भीतीने शरद पवारांची पुण्यातून माघार?

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भीतीने त्यांनी माढ्याचा मार्ग धरल्याचं कळतंय. आजच्या पत्रकार परिषदेत पवारांनी माढ्यातून लढण्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत.

देशाच्या राजकारणातील बदलत्या परिस्थिमुळे शरद पवार पुन्हा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून चाचपणीही केली होती. त्यासंदर्भात मध्यंतरी चर्चाही रंगल्या होत्या.

पवार स्वत: पुण्यातून उभे राहणार असल्याची कुणकूण लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:साठी पुण्यातून चाचपणी सुरु केली होती. स्वत: फडणवीस विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आणि पुण्यातील मतांचं गणित पाहता पवारांनी एक पाऊल मागं टाकल्याचं कळतंय.

दरम्यान, माढ्यातून लढा अशी विनंती विजयसिंह मोहिते-पाटील आणि पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांनी केली आहे. माझी इच्छा नाही मात्र विचार करु, असं शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे पवार लोकसभेला उभे राहिल्यास आश्चर्य वाटू नये.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींच्या विरोधात कोलकाता पोलिसांची तक्रार

-नितीन गडकरी होणार पंतप्रधान; ज्योतिष परिषदेत झाली भविष्यवाणी!

अरविंद केजरीवाल यांच्या गाडांच्या ताफ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला

अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला अश्रू अनावर!

नरेंद्र मोदींचे लोकसभेतील भाषण प्रथेला धरुन नव्हते- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या