बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवदूतच ठरला यमदूत’! पैसे नसल्याने डॉक्टरांनी चिमुरडीचं शिवलं नाही पोट अन्…

लखनऊ | डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रूप मानतो, आपल्यासाठी ते शेवटचा पर्याय असतात त्यामुळे आपण त्यांना देवदूतही समजतो. मात्र उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उपचारासाठी लागणारा खर्च देऊ न शकल्याने हैवानाच्या काळजाच्या डॉक्टरांनी अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर चालू असलेली शस्त्रक्रिया अर्धवट सोडली.

प्रयागराजमधील करेली भागातील ब्रह्मदीन मिश्रा यांच्या तीन वर्षीय मुलीला पोटाची समस्या होती. उपचारांसाठी प्रयागराजमध्ये धूमनगंजमधील रावतपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी मुलीच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर परत एक शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा रुग्णालयानं यासाठी दीड लाख रुपये घेतले होते. परंतू त्यानंतर रूग्णलयानं मिश्रा यांना पाच लाखाची मागणी केली.

आधीच दीड लाख कसेबसे जमा केलेले आणि त्यानंतर पुन्हा पाच लाख सांगितल्यावर मिश्रा यांना ते पैसे जमा करता आले नाहीत. पाच लाख न दिल्यामुळे रूग्णालयाने त्यांना मुलीसह बाहेर काढलं. पालकांना सांगितलेली उपाचाराची रक्कम ते देऊ न शकल्याने डॉक्टरांनी चिमुरडीवर चालू असलेली शस्त्रक्रिया अर्धवट तर सोडलीच पण डॉक्टरांनी चिमुकलीचं पोटदेखील शिवलं नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने चिमुरडीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, रूग्णालयाने बाहेर काढल्यानंतर मिश्रा दुसऱ्या अनेक रूग्णालयात गेले मात्र तेथे त्यांच्या मुलीला कोणीही अॅडमिट करून घेतलं नाही. तुमच्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला कोणी वाचवू शकणार नाही, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात आली. मात्र या सगळ्यामध्ये मुलीचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

धक्कादायक! आरोग्य अधिकाऱ्याने घेतली ‘कोरोना’ची लस अन् पाच दिवसातच…

‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More