बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेनेच्या दहशतीमुळेच…’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. मागील 7 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रकल्पांना फक्त मंजुरीच दिली नाही, तर अनेक प्रकल्प पूर्ण देखील करून घेतले आहेत. त्यातच आता वाशिम जिल्ह्यात शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळामुळे नितीन गडकरी यांना थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं लागलं आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामं सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदाराची यंत्रसामुग्रीची जाळफोळ करत आहेत. त्याचबरोबर अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्यात दहशत पसरवण्याचं काम करत असल्याची तक्रार नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचसोबत नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे गंभीर इशारा देखील दिला आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते असचं करत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची कामं मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी पत्रातून दिला आहे. या परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची कामं कशी करावी याचा मंत्रालय गंभीरपणे विचार करत आहे. चालू असलेली काम आहे त्या स्थितीत सोडल्यास लोकांना संकटाचा सामना करावा लागू शकतो, असंही यात म्हटलं आहे.

दरम्यान, काम तसेच सोडल्यास अपघाताचं प्रमाण वाढेल. आपण लोकांच्या दृष्टीत अपराधी होऊ. असं झालं तर महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात खंत राहिल, त्यामुळे लवकरात लवकर काम यातून मार्ग काढावा, अशी विनंती गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

थोडक्यात बातम्या-

रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश

कोरोना लढ्यात आणखी एक लस उपलब्ध; आता नाकातून घेता येणार लस

“माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको पण मी बोलणार, केंद्र सरकारने…”

‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More