बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे नोटांचा उडतोय रंग, ‘हे’ ठरतंय कारण!

नवी दिल्ली | कोरोनाचा फटका आता नोटांना देखील बसत आसल्याचं दिसत आहे. हात वारंवार सॅनिटाइझ केल्यामुळे तसेच धुतल्यामुळे नोटांचा रंग उडत असल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात या संदर्भातील माहिती दिलीये.

मागील दोन वर्षांत दोन हजारांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल 750 पटींनी वाढलं आहे. पाचशे आणि दोनशेच्या नोटांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्या तुलनेत छोट्या नोटांना कमी फटका बसला आहे, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे.

कोरोना संक्रमणाच्या भीतीने लोक मोठ्या प्रमाणात नोटा सॅनिटाइझ करत आहेत. ज्यांच्याकडे सॅनिटायझर नाही, ते लोक नोटा साबणाने धुऊन इस्त्री करीत आहेत. त्यामुळे नोटा खराब होत आहेत, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.

दरम्यान, छोट्या मूल्यांच्या नोटांत हे प्रमाण अर्ध्यापेक्षाही कमी आहे. नोटा खराब होण्यास कोरोना साथ जबाबदार असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. 2018-19 मध्ये दोनशेच्या केवळ 1 लाख नोटा खराब झाल्या होत्या. ही संख्या 2020-21 मध्ये 11.86 कोटी झाली. हे प्रमाण तब्बल 1,186 पट अधिक आहे. पाचशेच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण 40 पटींनी वाढलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

तिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार

8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More