बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ गोष्टींमुळे मुली जाऊ लागतात मुलांपासून दूर, वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली | प्रेमाचं नातं हळूहळू फुलत जातं म्हटलं जातं. नवीन नवीन सगळं काही छान असतं. कालानंतरानं मात्र याच प्रेमाच्या नात्यात दुरावा यायला लागतो, कटुता निर्माण व्हायला लागते. त्यामुळे सगळं विस्कटत जातं. कपलमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण सुरु होतं आणि दोघंही एकमेकांपासून दूर दूर राहू लागतात.

मुली मुलांपासून सहसा कोणत्या कारणामुळे दूर दूर राहतात हे आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये दोन्ही व्यक्तींना स्पेस देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जर ती दिली गेली नाही तर मुली सहसा मुलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. बराच वेळ व्यस्त राहिल्यानंतर अनेक मुले मुलींवर संशय घेऊ लागलतात त्यामुले मुली वैतागून दूर राहणं निवडतात.

लहान-सहान गोष्टींवरून मुलगा आपल्या प्रेयसीवर रागवतो हे ही मुलींना आवडत नाही. जर मुलीला काही समजत नसेल तर तिला प्रेमाने समजावूनही सांगता येते. पण पोरांनी तिच्यावर ओरडले तर नातं कमकुवत होतं.

दरम्यान, जर तुमच्या आधी तुमच्या मैत्रिणीच्या आयुष्यात कोणी असेल आणि तिने तुम्हाला त्याबद्दल सांगितले असेल. आता अशा परिस्थितीत तिला यावरुन पुन्हा पुन्हा टोमणे मारणे तर नात्यात दुरावा येऊ शकतो. मुलांनी जर जोडीदाराशी किंवा मैत्रिणीशी जवळीक साधण्यासाठी बळजबरी केली तर त्या तुमच्यापासून दूर राहू लागतात.

थोडक्यात बातम्या – 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर

संजय राऊतांचा थेट फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

मोठी बातमी! राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादीत प्रवेश

“फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत, तेच वकिली करत आहेत”

संजय राऊतांच्या टीकेला अमित शहांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More