मनोरंजन

“या कारणामुळे मला सिनेमांत किसिंग सीन द्यावे लागतात”

Loading...

मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीत ‘द सिरीअल किसर’ म्हणून नाव मिळवणारा अभिनेता इम्रान हाश्मी आता वेब सिरीजध्येही पाऊल ठेवत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘बार्ड ऑफ ब्लड’ या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब मालिकेच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत त्याने मी अनेकदा केवळ पैशांसाठीच काम केलं, असं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवडमध्ये काम मिळवणं सोपं आहे. पण एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून टिकून राहणं ही अत्यंत कठीण बाब आहे. यासाठी अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. अनेकदा नकोशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा देखील साकाराव्या लागतात, असं इम्रानने सांगितलं आहे.

Loading...

मी माझ्या कारकिर्दीत बऱ्याचदा इतर कलाकारांनी नाकारलेले चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमध्ये मला निर्मात्यांच्या आग्रहाखातर किसिंग सीन्स करावे लागले. या प्रकारच्या दृष्यांचा माझ्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम झाला, असं इम्रानने म्हटलं आहे.

मी कोणत्याही भूमिकेला नकार दिला नाही. कारण प्रत्येक वेळी दर्जेदार पटकथा असलेला चित्रपट तुमच्या वाट्याला येइलच असं सांगता येत नाही. आणि फक्त चांगले कथानक असलेल्याच चित्रपटांना निवडायचं असं जर ठरवलं तर अभिनेता म्हणून टिकून राहणं मला शक्य झाले नसते, असंही इम्रान म्हणाला.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या