बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“युद्धपातळीवर आढावा बैठका सुरू पण, येत्या 6 महिन्यात…”

मुंबई | देशाचे रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या झपाट्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयामुळं सतत चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनबाबत बोलताना म्हणाले, की आयातीवरील अंवलबित्व कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे.

नितीन गडकरी सोमवारी एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, की भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून नसलेला देश बनवण्याची गरज आहे. याबरोबरच देशाला येत्या सहा महिन्यामध्ये वीज टंचाईच्या संकटाला तोंड द्यावं लागणार असण्याची शक्यता गडकरींनी वर्तवली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी देशात कोळश्याचा तुटवडा तयार झाला होता. केंद्र सरकारने याबाबत युद्धपातळीवर बैठका घेऊन नियोजन केल्यामुळं देशावरील वीजटंचाईचे संकट टळलं आहे. सरकारी डिस्कॉमची अवस्था अत्यंत दयनीय आहे. नजीकच्या काळात देशाला आणखी वीजेची गरज भासणार आहे. कारण देशाच्या विकासाला वेग येण्याची शक्यता आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर पासून ते पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत वीजटंचाईचा सामना करावा लागणार आहे. देशात सध्या 3 लाख 88 हजार मेगावॅट वीजेची मागणी आहे. त्यापैकी 52 टक्के वीज ही कोळश्यापासून तयार केली जाते. तसेच चीन आणि युरोपमधून देशानं 30 टक्के कोळसा आयात केला आहे. त्यामुळे देशाला आगामी काळात वीजटंचाईचा सामना करण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More