‘फक्त तुझा डीपी बघून आलो होतो’; रॅपिडो रायडरने मुलीला रात्री केला मेसेज
मुंबई । ओला (Ola), उबर (Uber) नंतर आता रॅपिडो बाईक्सला (Rapido Bikes) जास्तीत जास्त पसंती मिळत आहे. स्वस्तातल्या स्वस्त अशा या बाईक्स आणि एकदम वेळेत पोहोचण्यासाठी याला लोकांनी पसंत केलं आहे. जवळचं अंतर कापण्यासाठी अनेकदा रिक्षाचालक नकार देत असतात तर दुसरीकडे ओला उबर प्रमाणापेक्षा जास्त पैसे घेतात.
ही बाईक सुरक्षेसाठी योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो. घडलेलं एक प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे ज्याने लोकांना आश्चर्यचकित केलं. एका ट्विटर युजरने तिच्या सोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर सांगत स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
ज्यामध्ये बाईक रायडरचे मेसेजेस वाचून तुमच्या सुद्धा भुवया उंचवतील. मुलीने आपले लोकेशन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रॅपिडो ड्रायव्हरला सांगितलं होतं. त्यानंतर ड्रायव्हरने तिला मेसेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. आणि लिहिलं की हॅलो झोप लागली का?.
मी फक्त तुझ्या डीपी आणि आवाजामुळे आलो, नाहीतर लोकेशन दूर होतं, मी आलो नसतो आणि हो, अजून एक गोष्ट, मी भैय्या नाहीये. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून घडलेल्या कृत्यावर रॅपिडो केअर्सने मुलीची माफी मागितली आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा
“मुलींना पैसेवाला बॉयफ्रेंड आणि नवरा हवा असतो, पण…”
…म्हणून रात्री झोपताना जोडीदाराबद्दल मनात राग ठेवून झोपू नका!
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणार असाल तर आत्ताच व्हा सावध!
Comments are closed.