मुंबई | शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार काही अनिर्वाच्च शब्द वापरताना दिसत आहेत. सदर व्हिडिओ हा 2017 सालचा आहे. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे.
अब्दुल सत्तारांनी जे काही तोंडाचे गटार उघडून स्वत:ची लायकी दाखवली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा लंकादहन निश्चित आहे, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. रावणाला सत्तेचा माज चढला होता. हनुमानाने पूर्ण लंका जाळून टाकली आणि हा माज उतरवला, अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
हनुमान चिरंजीवी आहे. पुन्हा एकजा लंकादहन निश्चित आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ शेअर करत राज्य शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. अब्दुल सत्तार प्रभु हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करत आहेत. तुम्ही स्वत:ला मर्द म्हणतात ना? तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विट करत अब्दुल सत्तारांना घेरलं आहे. 2019 विधानसभा निवडणुकीपुर्वी अब्दुल सत्तांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून अब्दुल सत्तारांना राज्यमंत्रिपद देखील देण्यात आलं.
पाहा ट्विट-
रावणाला सत्तेचा माज चढला होता…
हनुमंताने पूर्ण लंका जाळून टाकली आणि हा माज उतरवला…हनुमान चिरंजीवी आहे..
अब्दुल सत्तारनी जे काही तोंडाचे गटार उघडून स्वतःची लायकी दाखवली आहे त्यानंतर पुन्हा एकदा लंका दहन निश्चित आहे…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 27, 2022
पाहा ट्विट-
— nitesh rane (@NiteshNRane) April 27, 2022
थोडक्यात बातम्या-
इंधन दरवाढीवरून PM मोदींनी महाराष्ट्राला सुनावलं, म्हणाले…
“…नाहीतर त्याच ठिकाणी किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”
“सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर राऊतांनाच भूमिका मिळाली असती”
…तर 123 कोटी लोकांचा रक्तगट बदला -संभाजी भिडे
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ गंभीर कारण, म्हणाले….
Comments are closed.