Monthly SIP in Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक स्मार्ट (Smart) आर्थिक निर्णय (Financial Decision) असू शकतो, विशेषत: जर तुम्ही ते नियमितपणे (Regularly) करत असाल. तुम्ही दरमहा फक्त 2,000 रुपये जरी गुंतवलेत तरी तुम्ही तुमचे करोडपती (Millionaire) होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. हे कसे होऊ शकते आणि यासाठी काय करावे लागेल चला जाणून घेऊया.एसआयपी (SIP) म्हणजे काय? (Monthly SIP in Mutual Funds)
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan – SIP) हा एक मार्ग आहे ज्यामध्ये तुम्ही नियमितपणे ठराविक रक्कम (Fixed Amount) गुंतवता. ही पद्धत बाजारातील (Market) चढउतारांपासून (Fluctuations) तुमचे संरक्षण करते आणि तुम्हाला चक्रवाढीच्या (Compounding) फायद्यांचा लाभ घेण्याची संधी देते.
2,000 रुपयांच्या SIP ने करोडपती कसे बनाल?
समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 2,000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती 30 वर्षे सुरू ठेवली, तर या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 7,20,000 रुपये होईल. ही 30 वर्षांची गुंतवणूक आहे. म्हणजे 24,000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक (Annual Investment). आता तुम्ही 12 टक्के वार्षिक रिटर्न (Annual Return) जरी गृहीत धरले, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 30 वर्षांनंतर सुमारे 1.05 कोटी रुपये होईल. जर रिटर्न 15 टक्क्यांपर्यंत वाढले तर तुमची एकूण संपत्ती (Wealth) 2.63 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
म्युच्युअल फंडाचे फायदे
म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी (Long Term) गुंतवणूक करून तुम्हाला चांगले रिटर्न (Returns) मिळते. यामध्ये तुमचा पैसा वेळोवेळी वाढत जातो आणि तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो. SIP द्वारे नियमितपणे लहान रकमेची गुंतवणूक केल्यास जोखीम (Risk) कमी होते.(Monthly SIP in Mutual Funds)
उत्तम परतावा देणारे काही म्युच्युअल फंड
चांगल्या म्युच्युअल फंडांबद्दल (Mutual Funds) बोलायचे तर, HDFC टॉप 100 फंड (HDFC Top 100 Fund) आणि एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंडाने (SBI Consumption Opportunities Fund) गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. एखाद्याने एचडीएफसी टॉप 100 फंडमध्ये 25 वर्षांसाठी दरमहा 2,000 रुपये गुंतवले असतील, तर त्याची एकूण संपत्ती सुमारे 1.03 कोटी रुपये असेल. त्याच वेळी, जर एखाद्याने याच कालावधीत SBI कंजम्प्शन ऑपर्च्युनिटीज फंडमध्ये गुंतवणूक केली असती तर आज त्याची एकूण गुंतवणूक सुमारे 1.26 कोटी रुपये झाली असती. (Monthly SIP in Mutual Funds)
(टीप: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला घ्या.)
Title : Become a Millionaire with Just Rs 2000 Monthly SIP in Mutual Funds