बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एक चांगला कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे’, अक्षय कुमारच्या पोस्टनंतर चाहते भावूक

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपट, मालिकांचं शुटींग बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा सर्व प्रगतीपथावर येऊ लागल्याने रखडलेले प्रोजेक्ट मार्गी लागत आहेत. अशातच आता अभिनेता अक्षय कुमार याने ‘रक्षाबंधन’ या आपल्या आगामी चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाल्यानंतर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. एक उत्तम कलाकार बनून सेटचा निरोप घेतोय, असं अक्षयने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रक्षाबंधन चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोज देखील अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिल्लीतील प्रसिद्ध चांदणी चौकाचं सेटवर रिक्रिएशन पाहून अक्षय कुमार भावूक झाला होता. तसेच अक्षयने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याचे चाहते देखील भावूक झाले आहेत. अक्षयने या पोस्टद्वारे दिल्लीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सेटवरील फोटोज शेअर करत अक्षय कुमार म्हणाला की, चांदणी चौकातील रस्त्यांवर चालणं मी खूप मीस करत होतो. मात्र, मुंंबईतील माझ्या टीमने इतका सुंदर सेट बनवला की तो पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सुमित बासू तुम्ही बनवलेला हा सेट अगदी खऱ्या चांदणी चौकाप्रमाणे भासत होता.

तसेच आनंद सर मी तुमच्याबदद्ल काय बोलू. सर तुम्ही एक जादूगार आहात. आज रक्षाबंधन चित्रपटाचं शुटींग आपण पूर्ण करत आहोत. आज या शुटींगनंतर मी एक उत्तम कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे, असं देखील अक्षय कुमारने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद

“राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचा आढावा घ्या”

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव

शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More