महाराष्ट्र मुंबई

अटलजींच्या प्रेमामुळंच मी राजकारणात आलो- धर्मेंद्र

मुंबई | अटलजींच्या प्रेमामुळंच मी राजकारणात आलो, असं ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे त्यांनी अापल्या भावना व्यक्त केल्या. 

अटलजींचं माझ्यावर खूप प्रेम होतं. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा ते मला मिठी मारायचे. त्यांच्या कविता वाचून दाखवायचे. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ते बोलायचे, मी फक्त ऐकत बसायचो, असं धर्मेंद्र यांनी म्हटलं.  

दरम्यान, वाजपेयींचं देशावर फार प्रेम होतं. देशातील सगळ्यांनी गुण्यागोविंदानं राहावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, असंही धर्मेंद्र म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या