“20-22 वर्षांची पोरं हवेत गोळीबार करतात, ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण?”

Beed News

Beed | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील नव-नवीन प्रकरण रोज समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला 17 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप सर्व आरोपींना अटक झाली नाही. अजूनही यातील 3 आरोपी फरार आहेत. याच दरम्यान बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बंदुकांचे परवाने देण्यात आल्याचेही उघड झाले.हे सगळे परवाने कोणाच्या आशीर्वादाने देण्यात आले, असा संतप्त सवाल विरोधक आता उपस्थित करत आहेत. (Beed )

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत एक लिस्टच समोर आणली होती. त्यांनी याबद्दल ट्विट करत धक्कादायक आकडेवारी समोर आणली होती. बीड जिल्ह्यामध्ये परवाने नसतानाही अनेक जण बंदूका वापरत असल्याचं दमानिया यांनी म्हटलं होतं. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशात ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्यानेही यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.

बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे?, असा संतापजनक सवाल ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केलाय. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलं असून या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अखिल चित्रे यांच्या ट्वीटमध्ये काय?

‘गैंग्स ऑफ बीड’चे धनी कोण?’ बीडमध्ये हजारो पिस्तुल परवाने मागितले का जात आहेत? त्या पिस्तुलाच्या परवाना शिफारशींमागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हेच पिस्तुलधारी गुंड, त्याची 20-22 वर्षाची पोरं सणाला हवेत गोळीबार केल्याचे व्हिडीओ व्हायरल करतात पण त्यांच्यावर कारवाई का नाही? हे पिस्तुलधारी विरोधकांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात, पोलिसांशी अरेरावी करतात, कमरेला पिस्तूल लावून फिरतात. (Beed )

बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या ह्या गुंडांचा ‘धनी’ महायुती सरकारला का सापडत नाही? राज्य सरकार कुणाला पाठीशी घालत आहे? आणि का? असा हा कोण माणूस आहे जो महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेपेक्षा मोठा आहे? तो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे का? तसं असेल तर महाराष्ट्राने कारवाईची अपेक्षा करूच नये का? हे सर्व प्रश्न महाराष्ट्र जंगलराजच्या दिशेने जातोय कि काय अशी परिस्थिती निर्माण करत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री सन्मा. देवेन्द्रजी उत्तर द्या!, असं ट्वीट ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केलंय.

अंजली दमानिया यांचं ट्वीट काय होतं?

बीड मधे पिस्तुलांची थैमान ?1222 शस्त्र परवानधारक? इतक्या प्रचंड प्रमाणात, शस्त्र परवाने का देण्यात आले?
परभणीत 32 आहेत तर अमरावती ग्रामीण मधे 243 शस्त्र परवाने आहेत. मग बीड मधे इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वर्धस्ताने? 1222 अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील? वाल्मिक कराड ह्यांच्या नावावर लाइसेंस आहे पण त्यांच्याच गटातले कैलाश फड व निखील फड या दोघांकडे कोणतही लाइसेंस नाही. मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की, त्यांना तात्काळ अटक करावी आणि ह्या कराड गैंगला पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्यांची तत्काळ चौकशी लावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती. (Beed )

News Title –  Beed Akhil chitre tweets about Firearm licenses

महत्त्वाच्या बातम्या-

2100 की 1500?, येत्या चार दिवसात खात्यात येणार पैसे; महिलांनो ‘असं’ करा चेक

दुःखद घटना! लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, ‘इतक्या’ जवानांचा जागीच मृत्यू

विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन

देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव, मनातील इच्छा देखील होतील पूर्ण!

तुम्हाला प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती?; चौकशी दरम्यान अल्लू अर्जूनचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .