मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज 21 सप्टेंबररोजी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. काल त्यांची तब्येत खूपच खालावली होती. मात्र, मंत्री शंभूराज देसाई यांच्या फोननंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री उपचार घेतले. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. (Manoj Jarange )

आज मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने

जरांगे यांची तब्येत खालावलेली असतानाच काल रात्री जालन्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे समन्वयक आमनसामने आले. ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वडीगोद्री येथे ओबीसीकडून उपोषण सुरू आहे. याच्या अवघ्या 3 किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.

त्यातच वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले होते. बॅरिकेटिंग काढले नाही तर मी तिथं येतो. 15 मिनिटांमध्ये बॅरिकेटिंग काढा. नाही तर तिथं येऊन सागर बंगल्यापर्यंत तेच बॅरिकेटिंग फेकतो, असा इशाराच त्यांनी पोलिसांना दिला होता. यामुळे वडीगोद्रीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. (Manoj Jarange )

आज बीड आणि धाराशीव बंद

आज मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीड बंदची हाक देण्यात आली आहे. आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलं आहे. त्यामुळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यासोबतच धाराशिव जिल्ह्यात देखील बंदची हाक देण्यात आली आहे. (Manoj Jarange )

News Title :  Beed and Dharashiv closed today in support of Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या –

आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!

जरांगे पाटलांची प्रकृती खुपचं ढासळली; सरकार काय पाऊल उचलणार?

घरच्या घरी बनवा ‘हा’ फेसवॉश; आठ दिवसात मिळेल कोरियन ग्लास स्कीन

‘या’ प्रसिद्ध गायिकेनं घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण ऐकून म्युझिक इंडस्ट्री हादरली!

खासगी आयुष्याबदल तृप्ती डिमरीचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘कोणत्या धंद्यात…’