Beed crime | बीड जिल्ह्यातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांत बीडमधील अनेक धक्कादायक प्रकार उघड झाल्याने तेथील कायदा व पोलीस प्रशासनाबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Beed crime)
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) याच्यावर या हल्ल्याचे आरोप असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या प्रकरणावरून धस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या मुद्यावरून धस यांना धारेवर धरले आहे.
सुरेश धस यांनी स्टेटमेंट द्यावे
शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्याने हा मुद्दा अधिक गंभीर बनला. या व्हिडीओमध्ये भाजप पदाधिकारी सतीश भोसले एका व्यक्तीला बॅटने मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे, भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे उघड झाले आहे.
अंजली दमानियांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या घटनेवरून धस यांच्यावर हल्लाबोल केला. “सुरेश धस यांनी यावर स्टेटमेंट द्यावे आणि भोसलेवर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे. अन्यथा उद्या उठून हाच दुसरा वाल्मिक कराड (Walmik Karad) बनेल,” असं दमानियांनी म्हटलंय.
सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होणार का?
अंजली दमानियांनी या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “मी सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये सतीश भोसलेने एका व्यक्तीचे दात फोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा गुंड लोकांना वाटेल तसे मारत आहे. भोसलेवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुरेश धसांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो. त्यामुळे धस यांनी खुलासा करावा,” अशी मागणी दमानियांनी केली आहे. (Beed crime)
भोसलेकडे एवढं सोनं आलं कुठून?
दमानियांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. “भोसलेच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओमध्ये तो मोठ्या प्रमाणात सोने घालून फिरताना दिसतो. एवढ्या प्रमाणात सोनं त्याच्याकडे कुठून आले? मी स्वतः एक महिला असूनही माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या नाहीत, मग या गुंडाकडे एवढे दागिने कुठून आले?” असा थेट सवाल त्यांनी केला.
अधिवेशनात उत्तर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
अंजली दमानियांनी या प्रकरणात सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी केली असून, “जर फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र हवा असेल, तर त्यांनी अधिवेशनात यावर चर्चा करावी. अन्यथा मी उद्यापासून अधिवेशनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहे. आता हे गुंडगिरीचे प्रकरण सहन केले जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
Title : Beed crime Anjali Damania demands action on satish bhosale