बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल

Beed Crime News Police Officer Shocking News  

Beed Crime News | मराठा आरक्षण आंदोलन आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. अशातच बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. (Beed Crime News)

पोलीस मुख्यालयातच घडली घटना

अनंत इंगळे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. इंगळे हे पोलीस मुख्यालयातच कार्यरत होते. बुधवारी त्यांनी मुख्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. इंगळे यांनी नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)

देशमुख हत्याकांडाचा तपास सुरू

दुसरीकडे, बीड पोलीस सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा तपास करण्यात व्यग्र आहेत. याप्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं आहे. ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. (Beed Crime News)

News Title :  Beed Crime News Police Officer Shocking News  

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांसाठी आले कांद्याचे नवे वाण, फक्त ‘इतक्या’ दिवसात निघणार उत्पादन!

सूर्यवंशी कुटुंबाने 10 लाख रुपये नाकारले, राज्य सरकारला मोठी चपराक

वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड, लाडकी बहीण योजनेच्या…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .