Beed Scam l बीड जिल्ह्यात फसवणूक (Beed Scam) आणि गुन्हेगारीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. आता परळी तालुक्यात पीक विमा घोटाळ्याचा नवा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये जमीन एका शेतकऱ्याची असूनही दुसऱ्याने त्यावर विमा भरल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात (Parali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? :
पांगरी शिवारातील गट क्रमांक ३९ ही जमीन शेतकरी अंगद गणपतराव मुंडे यांच्या नावावर आहे. त्यांनी २०२२ व २०२३ मध्ये सात एकर तीन गुंठे जमिनीवर सोयाबीन पिकाचा पीक विमा ऑनलाईन भरला होता. परंतु काही दिवसांनी विमा कंपनीचे अधिकारी त्यांच्याकडे आले आणि “पीक विमा दोनदा का भरला?” असा सवाल केला. चौकशीनंतर कळाले की, मधुकर भगवानराव भारती (रा. लिंबुटा) यांनीही याच गट नंबरवर विमा भरला होता.
या प्रकरणात अंगद मुंडे यांचा पीक विमा (Pik Vima) रद्द करण्यात आला आणि त्यांना मिळायचा ९२,००० रुपयांचा चेक मिळालाच नाही. त्यांनी यासंबंधी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील चौकशी सुरू आहे.
Beed Scam l आणखी एक बोगस व्यवहार उघड :
याच गावातील अशोक किसनराव मुंडे यांच्या गट क्रमांक ७६ च्या जमिनीवरही अशीच फसवणूक झाली. धनराज उत्तम चौधर यांनी कौसाबाई लक्ष्मण राठोड यांच्या नावाने पीक विमा भरला आणि यामुळे अशोक मुंडे यांचाही विमा रद्द झाला. (Beed Scam)
या प्रकरणात मधुकर भगवानराव भारती, रवींद्र दामोदर मुंडे, धनराज उत्तम चौधर आणि कौसाबाई लक्ष्मण राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात असे अनेक प्रकार घडल्याचे समोर येत असून अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. (Beed Scam)