…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले धनंजय मुंडे

बीड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बीडच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. आढावा बैठकीत सहभागी झालेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडल्याची सध्या एकच चर्चा आहे.

बैठकांवर बैठका आम्हाला मान्य नाहीत. तातडीने उपाययोजना व्हायला हव्यात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि मी निघालो, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

आजच्या घडीला १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यातच बीडच्या दौऱ्यावर येणार होते, मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-राखीला ड्रामेबाजी पडली महागात; महिला कुस्तीपटूने रिंगमध्ये उचलून आपटलं

-आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार!

-वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम

-मंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक

-पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र शहीद