Top News औरंगाबाद महाराष्ट्र

बीड जिल्हा कोरोनामुक्त; धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक

बीड |  बीड जिल्ह्याने अखेर सुटकेचा निश्वास टाकला आहे कारण आष्टीतल्या एकमेव कोरोना रूग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. रूग्णाचा आलेला थ्रोट स्वॅब नमुना कोरोना रिपोर्ट नेगिटिव्ह आला. त्यामुळे बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे.

बीड जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एकमेव रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. संयमी जिल्हा वासीयांचे, प्रशासनातील प्रत्येक घटकाचे करावे तितके कौतुक थोडे आहे, अशा शब्दात त्यांन जिल्हावासियांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे. तर कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. हा शून्याचा आकडा टिकवायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दात त्यांनी जबाबदारीची जाणीव देखील करून दिलेली आहे.

बीड जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला फॉलोअप सॅम्पल निगेटिव्ह आढळून आला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याचा तपासणीसाठी दुसरा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दुसरा रिपोर्टही त्याचा निगेटीव्ह आला आहे.

दरम्यान, आम्ही हा शून्याचा आकडा वाढू देणार नाही. प्रशासन अतिशय व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत आहे आणि त्याला नागरिकांची देखील उत्तम साथ मिळत आहे, असं मुंडे म्हणाले.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांना छगन भुजबळांचा दणका; केली मोठी कारवाई

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा- उद्धव ठाकरे

गुड न्यूज! देशातील ही तीन राज्ये झाली कोरोनामुक्त

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या