बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली – पंकजा मुंडे

बीड | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराने बीड जिल्ह्याला सतत मान खाली घालावी लागत आहे, अशी खोचक टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीडचे अनेक अधिकारी ‘अॅंंटी करप्शन’च्या जाळ्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्र्यांवर भडकल्या. जिल्ह्यात जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा जिल्ह्यामध्ये एक आदर्श आणि कामाची उंची वाढली होती. आता सध्या या पालकमंत्र्यांच्या सत्तेत अनेक अधिकारी ‘अॅंटी करप्शन’च्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला मान खाली घालावी लागत आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कोणताच दबाव नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या मर्जीने काम करत आहेत. आमची सत्ता असताना सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना धाकात ठेवायचो पण आता तसं होताना दिसत नाही, असंही पंकचा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये भ्रष्टाचारी अधिकारी आणले. त्यांना वेळोवेळी अभय दिले. त्यामुळे अनेक अधिकारी ‘अॅंंटी करप्शन’च्या जाळ्यात अडकत आहेत. हे बीडसाठी चांगलं नाही. धनंजय मुंडेच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली गेली, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बॅंक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकारची सखोल चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

थोडक्यात बातम्या – 

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More