औरंगाबाद महाराष्ट्र

प्रशासकीय कार्यालयात जिवंत शेतकऱ्याची मृत म्हणून नोंद!

बीड | पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून एका शेतकऱ्याने अर्ज दाखल केला.. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चक्क त्या शेतकऱ्याची प्रशासकीय कार्यालयात मृत म्हणून नोंद केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यावर साहेब मी जिवंत आहे हो, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अनिल मिश्रा असं शेतकऱ्याचं नाव आहे. मिश्रा यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा. यासाठी त्यांनी धारूर तहसील कार्यालयात 4 डिसेंबर 2019 मध्ये अर्ज दाखल केला होता.

महिनाभरानंतर आपल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी अनिल मिश्रा तहसीलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एक धक्कादायक बाब त्यांच्यासमोर आली. अनिल हे जिवंत असूनही त्यांची मृत म्हणून नोंद करण्यात आली.

दरम्यान याप्रकरणी तात्काळ मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच धारूर पोलिसाकडे तक्रार करून या गंभीर प्रकारची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील”

पंतप्रधान मोदी एक दिवस ‘ताजमहल’ही विकतील; राहुल गांधींचं टीकास्त्र

महत्वाच्या बातम्या- 

मी घुसखोर नाही, तर घुसखोरांचा बाप- असदुद्दीन ओवैसी

शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा ‘आप’चा सदस्य- दिल्ली पोलीस

आज महाराज असते तर…; संभाजीराजेंचा संताप अनावर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या