पंकजा मुंडेंसाठी दादा समर्थक बीडच्या रस्त्यावर; कार्यकर्ते आक्रमक

Beed In NCP Supporter On The Street For Pankaja Munde

Beed | नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीत बीड (Beed) लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. बजरंग सोनवणे 6 हजार मतांनी विजयी झाले. मात्र पंकजा मुंडेंचा पराभव बीडकरांच्या जिव्हारी लागला.

अजित पवारांचे कार्यकर्ते बीडच्या रस्त्यावर

दरम्यान आता पंकजा मुंडेंबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्याने परळीत संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुषमा अंधारेंनी पंकजा मुंडेंवर टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, पंकजा मुंडे आणि बीडच्या (Beed) माजी खासदार प्रीतम मुंडेंनी बीडचा (Beed) विकास न केल्याने त्यांचा पराभव झाला. या टीकेनंतर अजित पवार यांचे कार्यकर्ते बीडच्या रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली आहे. (Beed)

सुषमा अंधारेंनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंवर केलेल्या आरोपामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. अंधारेंच्या या वक्तव्यावरून महायुतीकडून पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे. मुंबईवरून तुम्ही ज्या रस्त्यावरून येता. तो रस्ता पंकजा मुंडेंनी तयार केला असल्याचं राम कुलकर्णी म्हणाले आहे.

यामुळे आता सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे राष्ट्रवादीच्या समर्थकांनी दहन केलं. परळी शिवाजी चौकात अजित पवारांचे कार्यकर्ते एकत्र झाले. त्यावेळी त्यांनी सुषमा अंधारे हे जातीवाद निर्माण करत असल्याची घोषणाबाजी त्यांनी केली.

भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी माध्यमांशी बोलत होते. त्यांनी सुषमा अंधारेंना प्रश्न केला. तुम्ही मुंबईने परळीत ज्या रस्त्याने येता तो रस्ता पंकजा मुंडेंनी बनवला आहे. तर प्रीतम मुंडे यांनी दत्तक योजनेमध्ये जे पोहनेर गाव घेतले होते, त्या गावात कोणतंही विकास काम करण्याचं बाकी नव्हतं, असं राम कुलकर्णींनी पलटवार करत सुषमा अंधारेंना सुनावलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“लोकसभा निवडणूक जातीवादावर नाही तर विकासावर गेली आहे. इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे. आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळेच निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या की, बीड लोकसभा मतदारसंघात आधी पंकजा मुंडे, त्यानंतर प्रीतम मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे यांनी नेतृत्व केलं. या आगोदर विकासासाठी त्यांचे हात कोणी रोखले होते?, असा सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केला.

News Title – Beed In NCP Supporter On The Street For Pankaja Munde Burning Of Symbolic Statue

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना

“शिंदे-फडणवीसांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, राज्यातले उद्योग गुजरातला पळवले”

मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी देखील पायी वारीत सहभागी होणार?

“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .