बीडच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Beed Lok Sabha Election | बीडच्या राजकारणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामती गुट्टे यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा असंच एक प्रकरण समोर आलंय.

शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनाही मोबाईलवरुन शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात धमकी मिळाल्याने सध्या याचीच चर्चा होते आहे.

बीड मध्ये उद्या 13 मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. येथे महायुतीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे उभ्या आहेत. तर, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यात बीड लोकसभा मतदार संघाचाही समावेश (Beed Lok Sabha Election) आहे. त्यापूर्वीच हे प्रकरण समोर आलंय.

नेमकं काय घडलं?

फुलचंद कराड हे या लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय होते. ते शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या कार्यालयात कार्यकारीणीची बैठक घेत होते. याच क्षणी त्यांना फोन आला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर लगेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

फुलचंद कराड यांना जीवे मारण्याची धमकी

मात्र, तक्रार देऊनही कराड यांना फोनवरुन सारखे फोन येत होते. त्याद्वारे धमक्या दिल्या जात होत्या. इतकंच नाही तर, रात्री दीड वाजता थेट त्यांच्या घरासमोर काही व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून घराचे दार वाजवून ‘बाहेर ये’ असं म्हणत होते. गल्लीत आवाज झाल्याने लोक जागी झाले. इतक्यात ते पळून गेले. या सर्व प्रकरणामुळे आता बीडमधील (Beed Lok Sabha Election) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

News Title :  Beed Lok Sabha Election Death threat to Fulchand Karad 

महत्वाच्या बातम्या- 

…तेव्हा फक्त तयारी ठेवा!, सगळ्यांना दम भरणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंनी भरला दम

उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचं घातलं बारसं?, म्हणाले…

“दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचं..”; उद्धव ठाकरे कडाडले

कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर