“पंकजा मुंडेंना धोका दिला…”; शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लिपने बीडमध्ये खळबळ

Beed Lok Sabha | लोकसभा निवडणुकीत बीड या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली. येथे निकाल लागायला बराच उशीर झाला होता. सर्वांच्या मनात येथे कोण जिंकणार याबाबत धाकधूक होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बजरंग सोनवणेंकडून पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला.

या पराभवानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडल्या. तर, पंकजा मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बंद पुकारण्यात आला होता. मुंडे समर्थकांना हा पराभव खूपच जिव्हारी लागला. अशात एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामुळे बीडमधील राजकीय (Beed Lok Sabha) वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकसभा निवडणूक काळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगण्यात आलंय.

या ऑडिओतून दोन व्यक्तींचा संवाद स्पष्ट ऐकू येत आहे. या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले आहेत

दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग (Beed Lok Sabha) लावल्याचं ते या क्लिपमध्ये सांगत असल्याचं ऐकू येतंय.

नेमकं काय संभाषण झालं?

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे : मी बाप्पाचं पूर्ण काम केलं आहे. त्यांनी आता आपला दिलेला शब्द पाळावा. फक्त माझ्या गावातील 100-200 मतं पंकजा ताईला जास्त गेले. कारण ते करणं मला गरजेचं होतं.

शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर : हो
कुंडलिक खांडे : मला जातीवादी शिक्का नको. ओबीसी मतांचा आपल्याला विधानसभेला फायदाच आहे. बाकी 376 बुथवरची यंत्रणाला मी बाप्पााला देऊन टाकली हेही तितकंच खरं. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेला धोका दिला.
शिवराज बांगर : नुसती यंत्रणा नाही, तर बाप्पाासाठी पैसेही दिले का?
कुंडलिक खांडे : नुसती यंत्रणा नाही तर मी लोकांना पैसे देखील दिले.

दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे आता राज्यात (Beed Lok Sabha) एकच खळबळ उडाली आहे.

News Title –  Beed Lok Sabha Shinde Group Leader Kundlik Khande Audio Clip Viral

महत्त्वाच्या बातम्या

“बायकांनी दोन पतींची इच्छा व्यक्त केली तर…”; प्रसिद्ध अभिनेत्री भडकली

“…त्यांना आमच्या बोकांडी आणून ठेवलं, अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा”

“मागून येणाऱ्यांना अगोदर संधी मिळते हे वाईट”; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

पुण्याहून कोकणभागात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?