Beed Loksabha Election 2024 | आज राज्यासह देशात चौथ्या टप्प्यातील मतदान होताना दिसत आहे. अनेकांचे लक्ष आजच्या मतदानाकडे लागलं आहे. राज्यात दक्षिण अहमदनगर, शिरूर, मावळ, रावेर, बीड, पुणे लोकसभा मतदारसंघासह इतर ठिकाणी आज चौथ्या टप्प्यात मतदान होताना दिसत आहे. मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय वाघेरे विरूद्ध शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात लढत आहे. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातही मतदानासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळताना दिसतंय. मात्र असं असलं तरीही विरोधकांकडून सत्ताधारी उमेदवारांवर पैसे वाटल्याचे आरोप होताना दिसत आहे. तर काही लोकसभा मतदारसंघात गैरप्रकार घडल्याचा आरोप विरोधकांकडून होताना दिसत आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आधीच्या रात्री पैशांचा पाऊस पाडला गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता बीड लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण बीड लोकसभा मतदारसंघ हा मुंडेंचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला मिळवण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. मात्र आता बीड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर य़ेत आहे.
बीड मतदारसंघात एकच खळबळ
बीड लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार गटातून बंजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार ताकदवर आहेत. मात्र आता बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम बंद
बीड लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा धक्कादायक दावा हा बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हं अस्पष्ट दिसत असल्याचा धक्कादायक दावा बजरंग सोनवणे यांनी केला. यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता बीडमधील मतदानाची सूत्र बदलण्याची चिन्हे आहेत. यामुळे बीडची मतं कोणाच्या पारड्यात पडलीत हे सांगणं जरा कठीण आहे.
News Title – Beed Loksabha Election 2024 In Bajrang Sonawane Blame To opposite Party Regarding Blurred Symbol Show
महत्त्वाच्या बातम्या
मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू
राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका
अहमदनगरमध्ये आदल्या रात्री भाजपने पाडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर
या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार
“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण