पराभवानंतर पंकजा मुंडेंची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Beed Loksabha Election | लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं. राज्यामध्ये महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली. तर दुसरीकडे महायुतीने राज्यामध्ये केवळ 17 जागा मिळवल्या आहेत. एनडीएच्या सर्वाधिक जागा आल्या असल्या तरीही इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. एकाबाजूला एनडीए 400 पारचा नारा देत होतं. मात्र त्यांना 300 पर्यंत देखील आपला स्कोअर घेऊन जाता आला नाही. (Beed Loksabha Election)

राज्यात महाविकास आघाडी ही देशाच्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. राज्यात महाविकास आघाडीने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपची बोलती बंद केली आहे. अशातच आता बीड लोकसभा मतदारसंघाकडे (Beed Loksabha Election) अनेकांचं लक्ष लागलं होतं. एकाबाजूला बीड हा मुंडे आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे फॅक्टर ठरले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“माझ्या आयुष्यातील फारच विचित्र अशी निवडणूक होती. मी जेव्हा माझी मतमोजणी करत असताना मतमोजणी केंद्राबाहेर आले तेव्हा माझ्यावर काही जमाव आला.  माझ्या कारला जमावाने बुक्क्या मारल्या होत्या. मी विजय पराभव सर्व पाहिलेलं आहे. पण बीड जिल्ह्यात असं कधी घडलेलं पाहिलं नाही”, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

“त्यांना विजय पचवता आला पाहिजे. या विजयामागे कोणाचं योगदान आहे. कोणत्या विषयाचं योगदान आहे हा विषय वेगळा असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. मला जिल्ह्याची काळजी वाटते. पाहुया आता आमच्या वाट्याला, अनुभवायला काय काय येतंय,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे मतं

बजरंग सोनवणे यांना 6 लाख 83 हजार 950 मते तर पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 मते तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे 50 हजार 867 मते मिळाली आहेत. पंकजा मुंडे यांना 5553 मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Loksabha Election) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर ठरला. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं स्पष्ट झालं. कारण बीड येथे मनोज जरांगे पाटील यांनी याआधी अनेकदा आंदोलन केलं होतं. तसेच उपोषण देखील केलं होतं. त्यामुळे त्याचा परिणाम हा बीड लोकसभा मतदारसंघावर पाहायला मिळाला आहे.

News Title – Beed Loksabha Election In Pankaja Munde Loss After First Comment

महत्त्वाच्या बातम्या

“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

भाजपची धाकधूक वाढली! नितीश कुमारसोबत एकाच विमानाने ‘या’ नेत्याने गाठली दिल्ली

लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’

‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात