बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपणार?

Beed loksabha election Result | बारामतीनंतर सर्वांचं लक्ष हे बीड मतदार संघाकडे लागलं आहे. बारामतीमध्ये शरद पवार गटाने खातं उघडलं आहे. येथे सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला आहे. तर, बीडमध्ये देखील पवारांचा शिलेदार निवडून येण्याची दाट चिन्हे आहेत. मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात येथे अटीतटीची लढत होत आहे.

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपणार का?, त्या दिल्ली गाठणार का?, याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.  पंकजा मुंडे यांनी 22 व्या फेरीपर्यंत तब्बल 38 हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या काही निर्णायक फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे पुढे दिसून येत आहेत. अटीतटीच्या या लढतीत दोन्ही उमेदवारांमध्ये अगदी काँटे की टक्कर सुरु आहे.

पंकजा मुंडे आघाडीवर की पिछाडीवर?

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. पाचव्या फेरी अखेर तर त्यांनी मोठी झेप घेतली. त्यांनी 8 हजारांपेक्षा अधिकची लीड घेतली होती. पण नंतर पंकजा मुंडे यांनी ही लीड मोडीत आणली. आता मुंडे पुन्हा पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

बीड लोकसभेसाठी यंदा 41 उमेदवार उभे होते. महायुतीकडून पंकजा मुंडे तर महविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार हे नक्की होते. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांना मैदानात उतरवले होते. बीडमध्ये प्रथमच जातीचा मुद्दा देखील गाजला.अनेक गावांत दोन समाज (Beed loksabha election Result ) एकमेकांसमोर आल्याचे येथे दिसून आले.

बीडमध्ये भाजपचा पराभव होणार?

आता बीडमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. याबाबत अधिकृत अशी कोणतीची घोषणा झालेली नाहीये. मात्र, बीडमध्ये सध्या तरी तणावाचे वातावरण दिसून येत आहे.

News Title : Beed loksabha election Result 2024

महत्वाच्या बातम्या-

सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी

मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय

रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं

महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर