बीडमध्ये नेमकं काय सुरु आहे?, पंकजा मुंडेंचा खरंच पराभव झाला आहे का?

Beed Loksabha | बीड लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात इथं लढत रंगली आहे. ही लढत फारच अटीतटीची होताना पहायला मिळत आहे. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात बीडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीडमध्ये (Beed Loksabha) पंकजा मुंडे यांनी 22 व्या फेरीपर्यंत तब्बल 38 हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या काही निर्णायक फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे यांनी जोरदार मुसंडी मारली. शेवटच्या फेरीपर्यंत बजरंग सोनवणे यांनी काही हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर या ठिकाणी गोंधळाचं वातावरण तयार झाल्याचं कळतंय.

पंकजा मुंडे यांचा पराभव?

पंकजा मुंडे यांचा शेवटच्या निर्णायक फेऱ्यांमध्ये मोठी पिछेहाट झाल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे तसेच भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. बजरंग सोनवणे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा बाकी असल्याची सुद्धा माहिती आहे. अजून अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याने राज्यातील नागरिकांची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे.

शरद पवार यांचं ट्विट-

दरम्यान, बीडमध्ये (Beed Loksabha) तयार झालेल्या तणावाच्या वातावरणाची स्वतः शरद पवार यांनी दखल घेतली आहे. राज्याच्या पोलीस प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

News Title: Beed Loksabha pankaja munde bajarang sonawane final result

महत्त्वाच्या बातम्या-

आधी लेकाला अन् आता पत्नीला निवडून आणण्यासाठी अजितदादा ठरले सपशेल फेल

‘…म्हणून बारामतीत विजय मिळाला’; शरद पवारांनी सांगितलं कारण

ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?, जाणून घ्या सगळ्यांचा निकाल

सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी

मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय