बीडमध्ये आता नवा ड्रामा सुरु! पंकजा मुंडेंची विजयाची आशा पल्लवित, बजरंग सोनवणेंची धाकधूक वाढली

Beed Loksabha

Beed Loksabha | साऱ्या देशाचा निकाल स्पष्ट झालेला असताना बीडमध्ये मात्र मोठा हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे. या ड्रामामध्ये प्रत्येक मिनिटाला नवी अपडेट समोर येत आहेय भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात येथे काट्याची लढाई झाली. फायनल आकडेवारीत बजरंग सोनवणे आघाडीवर असल्याची माहिती आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. (Beed Loksabha) अशा परिस्थितीत आता नव्या मागणीमुळे निकाल बदलण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडे यांनी काय मागणी केली?

बीडमध्ये (Beed Loksabha) मोठं गोंधळाचं वातावरण असल्याची मागणी आहे. काट्याच्या झालेल्या या लढतीत बजरंग सोनवणे यांच्याकडे फक्त काही हजार मतांची आघाडी असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत आता भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार 32 फेऱ्या पूर्ण झाल्या असून पंकजा मुंडे यांनी बीड आणि गेवराई मतदार संघातील मतदानाची फेर मोजणीची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती असून सध्या येथे फेरमतमोजणी सुरु झाली आहे. 

पंकजा मुंडे यांची फेरमतमोजणीची मागणी मान्य झाल्याने आता बजरंग सोनवणे यांची धाकधूक वाढली आहे. शेवटच्या टप्प्यात निसटता विजय मिळवण्याची शक्यता असलेल्या बजरंग सोनवणे यांच्या काळजाचे ठोके सुद्धा आता वाढले आहेत. कारण फेरमतमोजणीत काही मतं कमी झाली तर बजरंग सोनवणे यांना पराभवाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो.

बीडमध्ये परिस्थिती गंभीर?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या घटनेसंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामुळे बीडमध्ये (Beed Loksabha) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या निकालाचे पडसाद या मतदारसंघात उमटू शकता. पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

News Title: Beed Loksabha Pankaja Munde Final update

महत्त्वाच्या बातम्या-

बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, आता शरद पवारांनी घेतली एन्ट्री… पोलिसांना थेट…

लोकसभा निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कसा निवडून येतो बघतोच म्हणणाऱ्या अजित पवारांना कोल्हेंनी दिलं उत्तर!

“आता रडीचा खेळ खेळू नका, पराभव मान्य करा”, बंधू भगिनीला सल्ला दिल्याने खळबळ

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .