बीड महाराष्ट्र

तरुणाच्या गुप्तांगावर लोखंडी गजाने वार; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं!

बीड | गुप्तांगावर लोखंडी राॅडनं वार करून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील लाडेवडगाव याठिकाणी बाबासाहेब चंद्रभान लाड यांचा काही अज्ञातांकडून हा निर्घृण खून करण्यात आल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

विवस्त्र अवस्थेत बाबासाहेब लाड यांचा मृतदेह शेताच्या बांधावर सापडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून लागलीच या घटनेचा पंचनामा करण्यात आला. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बाबासाहेब लाड यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत फेकून मारेकरी पसार झाले. मात्र या व्यक्तीचा खून कोणत्या कारणावरून झाला अन मारेकरी कोण याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे. युसूफ वडगाव पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र लाडेवडगाव याठिकाणी घडलेल्या या क्रूर हत्याकांडांनं परिसर भीतीच्या सावटाखाली गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एसटी महामंडळाकडून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित, परिवहन मंत्र्यांचा मोठा खुलासा!

ढोल-ताशा पथकांनाही कोरोनाचा फटका; गणेश मिरवणुका बंद

3 दिवसातील 25 हजारांपेक्षा जास्त नवे रूग्ण, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३ लाखांच्या पार!

“….तेव्हापासून काहींना डोहाळे लागलेत, पण महाराष्ट्रात गोड बातमी नाही म्हणजे नाहीच”

महाराष्ट्र भाजपने राजस्थानसाठी 500 जमवले, सावंतांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या