बीड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; वाल्मिक कराडनंतर आता…

Beed News after Walmik karad now athawale gang booked under mcoca in beed

Beed News | मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे सध्या बीड (Beed) जिल्हा राज्यात चर्चेत असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी अनेक जिल्ह्यात मोर्चे (Morcha) देखील काढण्यात आले. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे (Walmik Karad) नाव राज्यभरात चर्चेत आले असून खंडणी (Extortion) व खून प्रकरणात (Murder Case) त्याच्यावर आरोप होत आहेत. वाल्मिक कराडचे पोलिसांशी (Police) हितसंबंध असून पोलिसांकडूनच त्याला बळ देण्यात येत असल्याचे आरोप देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले आहेत. (Beed News )

दरम्यान, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याच्यावर मकोका (MCOCA) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट (Alert) झाली असून बीडमधील आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात गोळीबार (Firing) करणाऱ्या आठवले गँगवर (Athawale Gang) देखील पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी शितलकुमार बल्लाळ (Shital Ballal) यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेची (Sunny Athawale) ही आठवले गँग आहे.

दोन गँगवर मकोकाची कारवाई

बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजवणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. वाल्मिक कराडशी जवळीक असलेल्या सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे. १३ डिसेंबर २०२४ मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे (Peth Beed Police Station) हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले (Akshay Athawale), सनी आठवले, आशिष आठवले (Ashish Athawale), मनीष क्षीरसागर (Manish Kshirsagar) आणि ओंकार सवई (Omkar Sawai) यांचा समावेश आहे. (Beed News )

या आरोपींनी आतापर्यंत १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्यांचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सनी आठवलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून (Facebook Account) एक मोठी पोस्ट करत एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्यामध्ये, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडचे संभाषण असून कराडच्या सांगण्यावरून पोलीस कामकाज करत असल्याचा आरोप सनी आठवलेने केला होता. आता, त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळ्यांची माहिती घेऊन कारवाई होणार – पोलीस अधीक्षक

ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत, त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Navneet Kavat) यांनी म्हटले आहे. (Beed News )

Title: Beed News after Walmik karad now athawale gang booked under mcoca in beed

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .