बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच महत्त्वाचा निर्णय

Beed News Order of curfew till January 28

Beed News | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता एक महिना पूर्ण झालाय. मात्र, यातील एक आरोपी अजूनही फरारच आहे. आतापर्यंत 7 जणांना या हत्या प्रकरणात अटक झाली आहे. या सर्व आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तर, 2 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडलाही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा,अशी मागणी केली जात आहे. (Beed News )

या पार्श्वभूमीवर विरोधक आणि देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन सुरू केलं आहे.यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील सहभागी होत आहेत.येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने बीडमध्ये प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय.

बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. यानुसार, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे , निदर्शने , आंदोलने करण्यासास परवानगी नसणार आहे. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेली जुनी एसआयटी ही बरखास्त करण्यात आली आहे. यामधील अनेक अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. याबाबत मागे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे जुनी एसआयटी बरखास्त करुन नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. (Beed News )

नवी एसआयटी स्थापन

नव्या एसआयटी पथकात सहा जणांचा समावेश आहे. पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना एसआयटीच्या प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे. नवी एसआयटी स्थापन होताच बीडमध्ये हालचालींना वेग आला आहे. बीडमध्ये आता 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार आहे. (Beed News )

News Title : Beed News Order of curfew till January 28

महत्वाच्या बातम्या-

‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन

वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल!

मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण?

शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

आज मकर संक्रांती, आपल्या प्रियजणांना द्या ‘या’ हटके शुभेच्छा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .