Beed News | गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तर बीडमधील अनेक गुन्हे समोर आले आहेत. बंदुकीचे परवाने, खंडणी प्रकरण असे अनेक धक्कादायक प्रकार या दिवसांत उघड झाले आहेत. बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय? येथे कायदा-व्यवस्था याचा धाक आहे की नाही?, असे सवाल उपस्थित होत आहेत. अशात बीडमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Beed News )
बीडमध्ये आता चक्क पोलीस कर्मचाऱ्याचाच मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. येथे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. अनंत इंगळे असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार पहाटे घडला.
एसपींच्या कार्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याचा गळफास
इंगळे यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य का संपवले?, त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहे. मात्र, यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलीस आता घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. (Beed News )
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने बीड प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का?, याचा तपासही पोलीस करत आहेत. पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
सरपंच हत्येशी संबंध तर नाही?
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा अटकेत असून त्याचे येथील काही पोलिसांचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलीस तपासावर देखील संशय व्यक्त केला जातोय. अशात ही धक्कादायक घटना समोर आल्याने बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Beed News )
News Title – Beed News police constable Anant Ingle dead body found
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका
कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…
जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?
“कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच, सरकारने…”; मस्साजोग गावकरी प्रचंड दहशतीत?
सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडेंच्या वाढणार अडचणी?