Beed News | बीड जिल्ह्यात (Beed District) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच, जिल्ह्यात आणखी दोन सख्ख्या भावांची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Beed News)
दोन सख्ख्या भावांची जमावाकडून हत्या
बीड जिल्ह्यात आष्टी (Ashti) तालुक्यातील वाहिरा (Wahira) येथे गुरुवारी रात्री उशिरा जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अजय भोसले आणि भरत भोसले अशी मृत भावंडांची नावे आहेत. या हल्ल्यात कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
गावात उभे असताना अजय, भरत आणि कृष्णा यांच्यावर गावातील आणि बाहेरील काही लोकांनी लोखंडी रॉड (Iron Rod) आणि धारदार शस्त्रांनी (Sharp Weapons) हल्ला केला. हा हल्ला कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंभोरा पोलीस (Ambhora Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Beed News)
अंबाजोगाईत गोळीबार
तर, अजून एक दुसरी धक्कादायक घटना म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) शहरात जमिनीच्या वादातून (Land Dispute) गोळीबार (Firing) झाल्याचं समोर आलंय. मोरेवाडी (Morewadi) परिसरात हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत. (Beed News)
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सध्या प्रचंड चर्चेत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणी देखील रोज नवीन-नवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह नऊ जणांवर मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. घुले याला या गुन्ह्यातील टोळीचा म्होरक्या (Gang Leader) करण्यात आले आहे, तर वाल्मिक कराड याला सदस्य करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप कराड याच्यावर आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सीआयडीचे (CID) अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील (Kiran Patil) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला जाणार आहे.
Title : Beed News Two murders and firing incident in beed
महत्वाच्या बातम्या-
अभिनेता सैफ अली खानच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!
‘या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत
HERO स्प्लेंडरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्प्लेंडर
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई
पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!