बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करूणा शर्मांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा राज्यभर चर्चेत आहेत. करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि पिस्तूल बाळगल्या प्रकरणी करूणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. करूणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असताना करुणा यांच्या मुंबईमधील घरी बीड पोलीस दाखल झाले आहेत.

5 सप्टेंबर रोजी करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांनी मंंत्री धनंजय मुंडेंबाबत अपशब्द वापरले होते. याबाबत एक फिर्याद देखील नोंदवण्यात आली आहे. यामध्ये धनंजय मुंडेंना अपशब्द वापरल्याचा जाब विचारल्यानंतर करुणा शर्मा, अरुण मोरे यांनी एका महिलेवर चाकूने वार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

5 सप्टेंबरला परळीत येऊन धनंजय मुंडेंविरुद्ध मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सोशल मीडियावर करुणा शर्मा यांनी शेअर केलं होतं. मात्र परळीत पोहचताच करुणा यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. आपल्यावर केलेले आरोप खोटं असल्याचं म्हणत आपल्याला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अशातच आता करुणा शर्मा यांच्या सांताक्रूझ घरात बीड पोलीस दाखल झाले. आयपीएस अधिकारी सुनील जायभये यांच्या नेतृत्वाखाली पथक मुंबईत दाखल झालं असून सध्या हे पथक सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आहे.

थोडक्यात बातम्या-

दैव बलवत्तर! दरड कोसळली पण…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

गर्भवती असूनही रुग्णांची केली सेवा; नुकतीच आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं घेतला जीव

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत वाढ; सोमय्यांना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More