बीड महाराष्ट्र

मठात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बीड | मांजरसुंबा येथील मठात एका 15 वर्षीय अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली. यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तब्बल 12 मुलामुलींचीही या मठातून आता सुटका करण्यात आलीय. अंधश्रद्धेपोटी चाललेल्या या घटनेनं पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मांजरसुबा येथील मठात 15 वर्षीय अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मठातीलच एका 40 वर्षीय व्यक्तीवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास करताच त्यांना मठातील हादरून सोडणारी बाब निदर्शनास आली.

लैगिंक अत्याचार झालेल्या मुलीला वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यातच पालकांनी नवसाची म्हणून मठात सोडलं होतं. तसेच मठात अजून अनेक मुलं अडकली असल्याची माहितीही पीडित मुलीनं दिली. पोलिसांनी यानुसार मठावर छापा टाकून इतर 12 मुलामुलींची आता सुटका केली आहे.

दरम्यान पोलिसांनी या मुलांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सोपवलं आहे. अंधश्रद्धेपोटी तर काहींनी देवाला नवस बोलला म्हणून या आपल्या पोटच्या मुलांना मठात सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदेह

पुढील तीन दिवस ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

शाळा कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती

राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरु करा, कारण…- रोहित पवार

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेणार पण नाही- गिरीश बापट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या