औरंगाबाद महाराष्ट्र

आता मात्र कहरच! इंदोरीकरांच्या समर्थनासाठी महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर

Loading...

बीड | आपल्या कीर्तनात सांगितलेल्या पुत्रप्रातीसाठीच्या ऑड-इव्हनच्या फॉर्म्युलाने कीर्तनकार इंदोरीकर महाराज चांगलेच गोत्यात आले. त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी पुरोगामी विचारांच्या संघटनांनी केली. त्यासोबत त्यांचं समर्थनही मोठ्या प्रमाणात करत आहेत. अशातच एक महाराजांनी त्यांचं समर्थन वेगळ्याच पद्धतीने केलं आहे.

महाराजांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बीडच्या तांदळवाडीतले महादेव मंदिरातले भगवान महाराज यांनी बाभळीच्या काट्यावर साधना सुरू केली आहे. इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य अजिबात चुकीचं नाही त्यांच्यावर टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं भगवान महाराज म्हणाले आहेत.

बीडपासून तांदळवाडी हे गाव 25 किमी अंतरावर आहे. या गावात महादेवाचं मंदिर आहे. याच महादेवाच्या मंदिरात भगवान महाराज तपासाठी आले आहेत. 12 वर्ष तप करण्यासाठी ते या गावात आले आहेत, अशी माहिती आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षी राज्यात तसंच मराठवाड्यात बक्कळ पाऊस पडू दे यासाठी त्यांनी स्वत:ला झाडाला टांगून घेतलं होतं. त्यांच्या या साधनेची देखील संपूर्ण बीडमध्ये चर्चा होती. आता इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देण्यासाठी ते चक्क बाभळीच्या काट्यावर झोपले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ऑन द स्पॉट केली ही मोठी घोषणा

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फडकणार भगवा

महत्वाच्या बातम्या- 

शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिली खास मानवंदना

शिवरायांवरील स्टेटस व्हिडीओ टिकटाॅकसह सोशल मीडियात ठरतायेत सुपरहिट

कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या