बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत’; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

बीड | रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस (NCP chief Sharad Pawar’s birthday) असल्याने पक्षाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या  डिसेंबर जयंतीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.(Pankaja Munde criticizes Dhananjay Munde)

वाढदिवस साजरा करताना गरिबाच्या पोटाची भुक शमणार आहे का ?, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी केला आहे. बीडचे पालकमंत्री सध्या बॅनरवर दिसतात. तसेच पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सजलेल्या परळीवरून देखील टीका केली. स्वत:चा वाढदिवस आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

किती मोठ्या कमानी लावल्या, किती मोठ्या रांगोळ्या काढल्या, किती मोठे कट आउट लावले, त्यामध्ये गरिबाला काय मिळाल याचा विचार करावा, असं पंकजा मुडे यांनी म्हटलं आहे. खूप मोठी प्रतिकृती बनवली म्हणजे, पेंटींग केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का? असा प्रश्न करताना हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,आजचा दिवस हा सेवा आणि योजनांसाठी समर्पित केला आहे. आत्तापर्यंत गोपिनाथ गडावर देशाचे राज्याचे नेते येऊन गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि जयंत पाटील (Minister Jayant Patil) येऊन  गेले. गोपीनाथ गडावर कोणताही पक्षीय भेदभाव नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरवर्षी गरिबातील गरिब लोक गोपीनाथ गडावर येतात. मात्र, यावर्षी गोपीनाथ गड गावागावात घेऊन जाण्याचा संकल्प असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत नक्की शिवसेनेचे आहेत की राष्ट्रावादीचे?”

‘…तर आज युती तुटली नसती’; संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला

“शरद पवार म्हणजे पाॅवर हाऊस नेते, त्यांचा नेम अचुक असतो”

“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

“बॅचलर राहु नका, घरात बायको असली की माणसाचं डोक शांत राहतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More