बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास रे पठ्ठ्या! सुवर्णपदक पटकावलेल्या अविनाशवर धनंजय मुंडेंची कौतुकाची थाप

मुंबई | पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलॅटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तर कोमल जगदाळेने रौप्यपदक मिळवले आहे. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला आहे. 26 वर्षीय अविनाशने 8 मिनिटे 20.20 सेकंदात हे अतंर कापत रेकाॅर्ड बनवला आहे. विशेष म्हणजे 2019  मधला त्याने स्वत:चाच 8 मिनिटे 21.37 सेकंदाचा रेकाॅर्ड मोडला आहे.

मुळच्या बीडच्या अविनाशने पाचव्यांदा तीन हजार मीटर्स स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. या औचित्याने राज्याचे सामाजिक आणि न्यायमंत्री तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याच तोंड भरून कौतुक केलं आहे. अविनाशच्या या कामगिरीने जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्राला त्याचा सार्थ अभिमान आहे.

‘शाब्बास रे पठ्ठ्या! आमच्या बीडच्या अविनाश साबळेने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पटियाला फेडरेशन चषक राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत हे अंतर त्याने आठ मिनिटं 20.20 सेकंद वेळेत कापत सुवर्णपदक पटकावले! हा मुलगा ऑलीम्पिक मध्ये नाव काढणार हे नक्की!’, असं कौतुक करत धनंजय मुंडेंनी त्याला ट्विटरवरून कौतुकाची थाप दिली आहे.

अविनाश साबळेने यापुर्वीही जागतिक अजिंक्यपद अॅथलॅटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये स्वत:चाच नॅशनल रेकाॅर्ड मोडित काढला आणि जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा अविनाश पहिलाच भारतीय पुरूष धावपटू ठरला आहे. वयाच्या अगदीच 6 वर्षापासून त्याच धावण्याशी घट्ट नातं जोडलं गेलं आहे. कारण, त्याला रोज घर ते शाळा असा एकूण 6 किमीचा पायी प्रवास करावा लागायचा.

 

 

 

थोडक्यात बातम्या

‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”

…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ

एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र

धक्कादायक! थुंकी लावून रोटी करायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More