बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिअर पिणाऱ्यांनो सावधान, अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई | दारू पिणं हे आरोग्यासाठी अपायकारक आहे, असं आपण सातत्यानं ऐकत असतो. आजकालच्या जीवन पद्धतीमध्ये बिअर आणि दारू पिणं हे आनंद साजरा करण्याचं द्योतक बनलेलं दिसत आहे. आपण अनेकदा बिअर पिण्याचे फायदे ऐकून असाल, बिअर पिण्याचे तोटे सुद्धा आहेत.

आजकाल तरूण मंडळी किंवा मित्रमंडळी पार्टीमध्ये अनेकदा बिअर पिल्याने काही होत नाही, अशा गैरसमजात असतात. म्हणजेच बिअर आरोग्यासाठी हानिकारक नसून तिचं अनेकजण सेवन करतात. मात्र, बिअर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण अधिक असतं. अल्कोहोल आपल्या मानवी शरीरास अत्यंत घातक आहे.

बिअर पिल्याने आपल्या यकृतापासून मेंदूवर परिणाम होतो. जर तुम्ही एक ग्लास बिअर घेतली तर शरीराचे नुकसान होत थेट आतड्यात पोहोचतं. त्यानंतर बिअरमधील अल्कोहोल हे रक्तात मिसळलं जाऊन रक्तातील पेशींपर्यंत पोहचतं. बिअरच्या सेवनाने शरीरातील पोषक घटकांना पेशींमध्ये विरघळण्यापासून रोखतं. तसेच पुढं यकृतापर्यंत पोहचतं. त्यामुळे यकृताचा अपाय होऊ शकतो.

दरम्यान, त्यानंतर बिअरमधील अल्कोहोल मेंदूपर्यंत पोहचतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या बोलण्यावरील नियत्रंण हळूहळू गमवू लागता. दारू पिऊन जर तुमच्या शरीरात जास्त अल्कोहोल गेल्यामुळं तुम्ही काहीही बोलू लागता. त्यामुळं आपलं शरीर एकपेक्षा जास्त बिअर पिणं पचवू शकत नाही.

थोडक्यात बातम्या –

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तर असे भ्रम होतात म्हणे!”

“शाहरुख खानच्या मुलाला सोडून द्या, मी पण गांजा घेतला होता”

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

”जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ शब्द कोणी खेचू शकत नाही’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More