बिअर विक्रीत मोठी घट, Budweiser फेम कंपनीनं जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

Budweiser Beer

जगभरातील मद्य उद्योगात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत असून बिअरच्या विक्रीत घट तर नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सच्या मागणीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. बिअर उत्पादनातील आघाडीची कंपनी AB InDev ने नुकतेच डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल सादर केले असून महसूल वाढला असला तरी विक्रीत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिअर विक्रीत मोठी घट, कंपनीच्या महसुलात वाढ

AB InDev या बिअर उत्पादन करणाऱ्या कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.४ टक्क्यांनी वाढून १४.८४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मात्र, एलएसईजी विश्लेषकांनी कमाईत २.९ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या Budweiser, Corona आणि Stella Artois या लोकप्रिय ब्रँड्समध्ये विक्री घटल्याचे आढळून आले आहे.

कंपनीच्या अहवालानुसार, चीन आणि अर्जेंटिनामधील विक्रीत मोठी घट झाली आहे. एकूण नफ्याचे प्रमाण तिमाहीत १.९ टक्के तर २०२४ संपूर्ण वर्षात १.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. कंपनीच्या सीईओंनी सांगितले की, उद्योगातील आर्थिक संकटांमुळे ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. यामुळे या प्रमुख बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाली आहे.

नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सकडे कल वाढतोय?

बिअरच्या विक्रीत घट होत असताना अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सचा (Non-Alcoholic Drinks) वाटा वाढवत आहेत. अल्कोहोलचा वापर कमी होणे हा सध्या जागतिक ट्रेंड बनत चालला आहे. कंपन्यांसाठी हा बदल मोठी संधी ठरू शकतो, असा अंदाज AB InDev च्या सीईओंनी व्यक्त केला आहे.

डॉलरच्या वाढत्या किमतीचा परिणाम उद्योगावर होण्याची शक्यता असून टॅरिफमुळे फारसा फरक पडणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जागतिक पेय बाजार सध्या अनेक आव्हानांना सामोरे जात असला तरी भविष्यात या क्षेत्रात सकारात्मक वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

News Title: Beer Sales Decline, Non-Alcoholic Drinks Gaining Popularity Budweiser

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .