नवी दिल्ली | आता मित्रांसोबत पार्टी करणं तळीरामांना चांगलंच महागात पडू शकतं. तुमच्या पार्टीत बीयरचा (Beer) समावेश असेल तर तुमच्या खिशाला नक्की कात्री बसणार आहे. ऐन उन्हाळ्यात आता थंडगार बीयर महागणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की थंडगार बीयरच्या विक्रीचं प्रमाण वाढतं. मात्र, यंदा वेगवेगळ्या कंपन्यांच्या बीयर दरात जवळपास 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे या उन्हाळ्यात बीयर पिणं महागणार आहे.
रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) हे बीयरचे दर वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. प्रमुख गहू उत्पादक देशांमध्ये रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचा समावेश आहे. बीयर तयार करण्यासाठी गहू सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या युद्धामुळे गव्हाची निर्यात थांबल्याने परिणामी बीयरच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.
दरम्यान, आधी कोरोना (Corona) महामारीमुळे बीयर व्यवसाय ठप्प झाले होते. कोरोना परिस्थिती आता कुठे पुर्ववत येत आहे. मात्र, साधारण दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा बीयर व्यवसायाला पुन्हा एकदा मोठा फटका बसत आहे.
थोडक्यात बातम्या-
“राणे, सोमय्या, कंगना रनौतच्या पंक्तीत आता राणाही बसतील”
मोठी बातमी! हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ पाऊल
काहिली वाढणार काळजी घ्या! IMD कडून ‘या’ पाच राज्यांना अलर्ट जारी
बच्चू कडूंना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
‘ये भोगी’ म्हणत अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Comments are closed.