नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकरणात गेल्या महिन्यापासून मोठा सत्तासंघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी( Eknath Shinde)शिवसेनेचे(Shivsena) फुटीर आमदार सोबत घेत भाजपसोबत (BJP)सत्ता स्थापन केली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा वाद शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये सातत्याने होत आहे. हा वाद कोर्टात पोहोचला होता. या वादासह चार याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
सुनावणी आज होणार असली तरी सुनावणीपूर्वीच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाने शिवसेनेवर केलेले सर्व आरोप शिवसेनेने खोडून काढले आहेत. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai)यांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. या पत्रात भाजपने कधीही शिवसेनेला बरोबरीचा दर्जा दिला नाही. महाविकास आघाडीवर जर मतदार नाराज असते, तर शिंदे गटातील कॅबिनेटमध्ये त्यांनी तशी भूमिका मांडली असती, असंही नमूद केलं आहे.
त्यांनी भूमिका मांडली नाही, त्यामुळे शिवसेनेने आघाडी केल्याचा शिंदेचा दावा खोटा ठरतो. हा आरोप आता केला जातोय, गेल्या अडीच वर्षात हा आरोप का केला नाही, असा प्रश्न या प्रतिज्ञापत्राद्वारे शिवसेनेने केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सर्व सोयी सुविधांचा फायदा घेतला. त्यांनी कधी मतदार आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले नाही. जर हे नेते इतकेच त्रस्त असते, तर ते कॅबिनेटमध्ये सहभागी झाले नसते, अशी भूमिका शिवसेनेने न्यायालयात मांडली आहे.
दरम्यान, न्यायालयाकडून काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी हा निर्णय महत्वाचा आहे. जर शिवसेनेकडून निकाल लागला तर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकार कोसळू शकते.
थोडक्यात बातम्या-
उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक, म्हणाले…
प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या…
“गद्दारांची गाडी फोडणार त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार करणार”
संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, स्वत:च केला होता खुलासा
“ईडीचा वापर 2024 पर्यंत असाच चालणार”
Comments are closed.