बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वबळाची भाषा करण्याआधी फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे”

मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला होता. नाना पटोले यांच्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही स्वबळाची भाषा केली होती. यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. यावरून शिवसेनेने आपल्या सामनाच्या आग्रलेखातून भाष्य करत शिवसेनेला सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती होती तेव्हाही शतप्रतिशत भाजप हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणं हे काही चुकीचं नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे, असा टोला सेनेनं काँग्रेसला लगावला.

शनिवारी राहुल गांधी यांचाही वाढदिवस होता. यानिमित्ताने काही कार्यक्रम, पक्षप्रवेश असे सोहोळे पार पडले. त्यातील एका सोहोळय़ात प्रदेश काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची गर्जना केली गेली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाची भाषा करतच असतात. त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाली. या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असं शिवसेनेनं म्हटलंय.

चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलग 15 वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारला घरी बसवले होते व फडणवीसांचे राज्य आले होते. त्यामुळे चव्हाण यांना काँग्रेस पक्षाची बांधणी नव्या जोमाने करावी लागणार असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशभरात कोरोना रूग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 88 दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

महाराष्ट्राला जून महिन्यात ‘इतक्या’ लाख लसीचे डोस मिळणार

“तुमचा 51 वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय”

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचं हेच आपलं लक्ष्य”

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More