बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीआधी सोनं पुन्हा महागलं! वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत वार्षिक 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या दिवाळीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनं स्वस्त होईल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे, मात्र सोन्याच्या दरात होणारी वाढ ही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे.

भारतीय दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा 47,050  रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. मागील व्यापारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 46,938 रूपये होता.

चांदीच्या किंमतीत सुद्धा आज जबरदस्त घसरणीचा कल दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर काहीच रूपयांनी वाढ न होता 63 हजार 767 प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदवली गेली आणि ती 1803 डॉलर प्रति औंसवर पोहचली. तर चांदीचा दर चांदी 24.12 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली आहे.

दरम्यान, दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 49 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 4 हजार प्रति 10 ग्रॅम वाढू शकतात. त्यामुळे सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतंय. 2020 च्या सप्टेंबर तिमाहीत देशाची एकूण मागणी 94.6 टन होती. त्यामुळे या वर्षात मागणी वाढणार की नाही, हे सोन्याच्या दरावर अवलंबून आहे.

थो़डक्यात बातम्या-

पाकिस्तानची चिंता वाढली! ‘या’ 3 खेळाडूंना कोरोनाची लागण

“ठाकरे सरकार फक्त एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे…”

…तर मी राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मी गुडघ्यावर बसण्यास तयार”, अखेर क्विंटन डिकाॅकची माघार

‘…म्हणून पाकिस्तान जिंकल्यावर मी स्टेटस ठेवलं’; माफी मागत नफीसानी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More